Edition

खोतवाडी यड्राव फाटा येथे डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाविरुद्ध शहापूर पोलिसांत गुन्हा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती वृत्तसेवा, खोतवाडी – दि. ३ जुलै : जयसिंगपूर–इचलकरंजी मार्गावरील खोतवाडी येथे हॉटेल आनंदसमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश विठ्ठल शिंदे (वय ३६, रा. एच. एम. स्पोर्ट तरुण मंडळ, नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे टीव्हीएस स्पोर्ट (क्र. MH 51 7224) या दुचाकीवरून आरटीओ कार्यालय, शहापूर येथे जात होते. दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास खोतवाडी येथील हॉटेल आनंदसमोर मागून आलेल्या डंपर (क्र. MH 10 CR 9495) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सतीश शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. डंपर चालक दशरथ लक्ष्मण व्हनमोरे (वय ४८, रा. सांगलवाडी, ता. मिरज, जि. सांगली) याने डंपर भरधाव व निष्काळजीपणे चालवून हा अपघात घडविल्याचा आरोप फिर्यादी अजित भाऊसो सूर्यवंशी (वय ४५, व्यवसाय चालक, रा. माळ भाग, रामनगर, नांदणी, ता. शिरोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३९/२०२६ अन्वये संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोहेकॉ. गायकवाड यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंगसे करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!