Edition

किसन वीर महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची उल्लेखनीय कामगिरी; सार्थक डेरेची भारतीय नौदलात निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाई, प्रतिनिधी – दि. ३ जुलै : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील कॅडेट सार्थक दत्तात्रय डेरे याची भारतीय नौदलात निवड झाली असून, महाविद्यालयासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
एनसीसीचे प्रशिक्षण घेत असताना सार्थक डेरे याने विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. चिकाटी, कठोर परिश्रम आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर त्याने भारतीय नौदलात स्थान मिळविले. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
दरम्यान, एनसीसी विभागातील कॅडेट आदित्य तुळशीदास वाडकर यानेही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. गुजरात येथील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (RRU) येथे NIELIT संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या सायबर डिफेंडर कॅम्पमध्ये त्याने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरात सायबर सुरक्षा, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम, मोबाईल सुरक्षा तसेच विविध आधुनिक तांत्रिक साधनांचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले.
तसेच कॅडेट आदित्य विजय गुरव याने हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स अंतर्गत रिजनल वॉटर स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर, पोंग डॅम येथे आयोजित विशेष जलक्रीडा प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.
या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे आणि एनसीसी अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन (दादा) भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ. विनोद वीर, २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, साताराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आनंद सिंग, सुभेदार मेजर हिरेमठ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!