Edition

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अर्णव गावडे राज्यात दहावा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदगड प्रतिनिधी,संजय आगाशे :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये नागणवाडी येथील संजय गांधी विद्यालय शाळेचा विद्यार्थी अर्णव संजय गावडे याने घवघवीत यश संपादन केले राज्यात दहावा येण्याचा बहुमान पटकावला आहे.अर्णव हा अत्यंत हुशार आणि कष्टाळू मुलगा आहे.त्याने परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नियमित ६ ते ७ तास अभ्यास केला.शाळेतील शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन आणि रोजच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या सवयीमुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.या यशामागे संजय गांधी विद्यालय नागनवाडीचे मख्याध्यापक भोगुलकर सर मार्गदर्शक बारवेलकर सर,व्ही.बी पाटील सर,सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील साहेब,जी.बी.जगताप साहेब शिक्षण विस्तार अधिकारी परशराम सुभेदार सर,प्रभावती पाटील मॅडम या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!