Edition

अतिग्रे परिसरात बिबट्याच्या वावराची शक्यता; वन विभागाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अतिग्रे प्रतिनिधी – हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावात संजय घोडावत यांच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यालगत काही शेतकऱ्यांना बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे आढळल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसराची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
वन विभागाचे अधिकारी संजय कांबळे, मंगेश वंजारे तसेच रेस्क्यू फोर्सचे वैभव आवळे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पायांच्या ठशांची तपासणी व निरीक्षण केले. तपासणीनंतर संबंधित परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी होईपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. संध्याकाळी ६ नंतर लहान मुलांना एकटे बाहेर जाऊ देऊ नये, रात्री शेतात किंवा मळ्यात एकटे जाणे टाळावे, शक्यतो समूहानेच जावे, तसेच दुर्गम किंवा सुमसान रस्त्यांवरून जाताना आवाज करत किंवा वाहनाचा हॉर्न वाजवत प्रवास करावा, असे सांगण्यात आले आहे.
याशिवाय घर व मळ्याभोवती पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवणे, मोबाईल टॉर्च जवळ बाळगणे, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे, तसेच बिबट्यासदृश प्राणी दिसल्यास त्याचा पाठलाग किंवा छायाचित्रण करण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वन विभाग, ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतातील झुडपे व गवत साफ ठेवणे, शाळा, अंगणवाडी, बसथांबे आदी ठिकाणी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवणे, अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे आणि संशयास्पद हालचाली तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
वन विभाग आणि ग्रामपंचायत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे वन विभागाचे अधिकारी संजय कांबळे यांनी आवाहन केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!