Edition

शारदा माध्यमिक शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक भरत रोडगे यांचा आज सेवा गौरव संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.सेलू : सेलू येथील कै.सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील सहशिक्षक भरत रामराव रोडगे हे नियत वयोमानानुसार मंगळवार दिनांक 30 जून रोजी सेवा निवृत्त झाले त्या बद्दल त्यांचा सपत्नीक सेवा गौरव सोहळा संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रामनाना पाटील , प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव चंद्रप्रकाशजी सांगतानी,माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक मुंजाभाऊ भिसे , उपविभागीय अभियंता अनंतराव जाधव ,उत्तमराव गजमल, उद्धवराव लिपणे , भीमराव कोकाटे ,सतीश भालेराव , प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावडे संचालक प्रल्हादराव कान्हेकर, श्रीमती मीरा जोशी , सतीश भालेराव ,मुख्याध्यापक डी डी शिंदे , मुख्याध्यापिका सौ उषा कामठे , सत्कार मुर्ती भरत रोडगे, सौ.संगीता रोडगे, प्रफुल्ल रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.भरत रोडगे व सौ संगीता रोडगे यांचा संस्थेच्या वतीने तसेच माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्मीणीची प्रतिमा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला, तसेच नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के.के. देशपांडे,पर्यवेक्षक गणेश माळवे,शंकर बोधनापोड,न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय भागवत, प्रा.शरद मगर, पत्रकार डॉ.शिवाजी शिंदे, प्रदीप कौसडीकर , सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, रवळगाव ग्रामस्थांच्या वतीने ॲड. बालासाहेब रोडगे, गणेश रोडगे यांनी भरत रोडगे यांचा सपत्नीक सत्कार केला. या प्रसंगी अभिमान पाईकराव, गणेश रोडगे, डॉ शिवाजी शिंदे, भिमराव कोकाटे, उत्तमराव गजमल, आनंतराव जाधव, चंद्रशेखर नावाडे यांनी आपल्या मनोगतातून रोडगे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर एस एम जुमडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहीदास चव्हाण, सौ अर्चना फोपसे- पठारे, सोमेश शिंदे, आनंद देवधर, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, सौ साडेगावकर, श्रीमती फुलारी आदिंनी परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!