सेलू : सेलु शाखेच्या SBIN0003797 वालुर रोड रोड सेलु या ठिकाणी कर्ज विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यां मुळे ग्राहकांना होणाऱ्या गैरसोय होत आहे अशा तक्रारीवरून ग्राहक पंचायत सेलुच्या वतीने शाखा व्यवस्थापक श्रीमान विवेक कुमार यांना विचारणा व त्या टेबलवर जोपर्यंत अथोराईज कर्मचारी येत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती करण्यास गेले असता व्यवस्थापक विवेक कुमार यांच्या कडुन अनपेक्षित असे उत्तर मिळाले. ते म्हणाले मागील 40 ते अधीक दिवसांपासून या टेबलचे काम करणारे प्रविण जायभाय यांची बदली झाली आहे. मी देखील बदली होऊन नुकताच या शाखेचा चार्ज घेतला आहे आम्ही कामाने त्रस्त असतो.आम्ही कर्ज विभागात जोपर्यंत या टेबलवर कोनी नवीन कर्मचारी येत नाही तोपर्यंत काहि व्यवस्था करू शकणार नाहीत.”तुम्हे हमारी जो भी शिकायत करणी है हमारे वरीष्ठ से करे उसका जवाब हम हमारे सीनीयर को देगे लेकीन हम ईस बारे मे कुछ नही कर सकते.”अशा प्रकारची वागणूक शाखा व्यवस्थापक श्रीमान विवेक कुमार यांच्या कडुन अनुभवण्यात आली आहे. खर तर या टेबलवर गृह कर्ज, पेन्शन कर्ज, सोने तारण कर्ज, पिक विमा, पि.एम.सुर्य घर योजना आणि विविध सरकारी योजनांसारखी कर्जे सहज सुलभतेने या पूर्वीचे आसनारे प्रविण जायभाय हे करत होते व तेवढेच चांगले व सहकार्य करणारे या पुर्विचे व्यवस्थापक श्री गावढे साहेब हे होते. तथापि गेल्या ४० ते अधिक दिवसां पासून, या टेबलवर कर्ज मागणी साठी येणाऱ्या ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीमुळे व व्यवस्थापक याच्या आडमुठे पणाच्या धोरणामुळे संर्व सामान्य ग्राहकांची मात्र पंचायत झालेली आहे असे मात्र दिसुन ऐत आहे.











