Edition

कुरळपमधील सहकारी संस्था व भक्त मंडळांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध; प्रांत अधिकाऱ्यांना ठराव सादर..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर प्रतिनिधी – प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कुरळप गावातील विविध सहकारी संस्था, दूध संस्था, पतसंस्था तसेच धार्मिक संघटनांनी एकत्र येत महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील विनंती ठराव प्रांत अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला.
कुरळप सर्व सेवा सहकारी सोसायटी, राजाराम बापू पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, महालक्ष्मी वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्था, हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्था, श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ, श्री वारणा शेतकरी सहकारी दूध व्यवसाय संस्था, शेतकरी सहकारी दूध व्यवसायिक संस्था, शिवाजी नागरी सहकारी पतसंस्था तसेच संकल्प ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांनी या ठरावाला पाठिंबा दर्शविला.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक विकासावर परिणाम होणार असल्याची भावना व्यक्त करत संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. या वेळी हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन जोतिराम माळी (सर) यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती, कुरळप यांच्या वतीने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सहकारी संस्था, दूध संस्था, पतसंस्था आणि श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले. गावातील विविध सामाजिक, धार्मिक व सहकारी संस्थांनी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढ्याला बळ दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!