Edition

चांदोली धरण परिसरात पावसाची दमदार सुरुवात; भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – यंदाच्या हंगामात प्रथमच चांदोली धरण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
धुळवापे परिसरात यापूर्वी करण्यात आलेली भाताची पेरणी चांगल्या प्रकारे उगवली असून या पिकाला सध्या पावसाच्या पाण्याची नितांत गरज होती. वेळेवर झालेल्या पावसामुळे भात पिकाला आवश्यक ओलावा मिळाल्याने पिकाच्या वाढीस चालना मिळणार आहे.
यंदा मान्सूनच्या उशिरामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी पेरणी केलेले पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, चांदोली धरण परिसरात सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान, पावसामुळे परिसरातील शेतशिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामाला मोठा आधार मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!