Edition

कुरळपमध्ये हिंस्त्र प्राण्याचा धुमाकूळ; सात मेंढ्या ठार, तीन जखमी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – कुरळप, ता. वाळवा : कुरळप गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या धनगर तळावर अज्ञात हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात सात मेंढ्या ठार तर तीन मेंढ्या जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे मेंढपाळ व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ बाजीराव माने यांची मेंढरे धनगर तळावर वस्तीला होती. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास बाजीराव माने हे जेवणासाठी घरी गेले असता, अज्ञात हिंस्त्र प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. या हल्ल्यात बारीक व मोठ्या मिळून सात मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच रात्रीत झालेल्या या मोठ्या नुकसानीमुळे मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी व मेंढपाळांनी अधिक सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेची वन विभागाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा, हल्ला करणाऱ्या हिंस्त्र प्राण्याचा शोध घेऊन बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त मेंढपाळाला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व मेंढपाळांनी केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!