Edition

लेडी हार्डिंग रुग्णालयात सम्राट अशोक सेनेचे ठिय्या आंदोलन; जुळ्या बाळांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अकोला प्रतिनिधी : शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग) येथे कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आकाश दादा शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचल्यानंतर एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने आंदोलकांचा संताप वाढला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू करत घोषणाबाजी केली. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करण्यात आले व चुकीच्या उपचारांमुळे जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आंदोलकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे, दोषी आढळणाऱ्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करणे तसेच गैरहजर अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा जिल्हाभर चक्काजाम व जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत अंतर्गत चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली असून चौकशी अहवालानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आंदोलनावेळी वैभव इंगळे, सनी सरदार, अजिंक्य इंगळे, निखिल गायकवाड, धनंजय चक्रनारायण, संमेक डोंगरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!