Edition

बोरगावात शक्तिपीठ महामार्गाविरोधातील हरकती संकलनास सुरुवात; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर प्रतिनिधी – प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात बोरगाव येथे बाधित शेतकरी व नागरिकांच्या हरकती संकलित करण्याच्या उपक्रमाला शनिवारी सुरुवात झाली. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून आपल्या हरकतींची नोंदणी करत आहेत.
हरकती अर्जामध्ये केवळ जमीन संपादनाचा मुद्दा मांडण्यात आलेला नसून, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवर वर्षानुवर्षे केलेल्या खर्चाचाही तपशील नमूद केला आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उभारलेली पाईपलाईन, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी टाकलेला लाल मातीचा भराव, सिंचन व्यवस्था, शेतातील अंतर्गत सुविधा तसेच विविध कायमस्वरूपी सुधारणांवर झालेल्या खर्चाची माहिती अर्जात देण्यात आली आहे.
महामार्गामुळे केवळ जमिनीचे क्षेत्र कमी होणार नसून, शेतीची रचना, सिंचन व्यवस्था आणि भविष्यातील उत्पादनक्षमतेवरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई निश्चित करताना जमिनीवरील प्रत्यक्ष गुंतवणूक, शेतीसाठी केलेल्या सुधारणा आणि विकासकामांवर झालेल्या खर्चाचाही विचार करण्यात यावा, अशी मागणी हरकतींमधून पुढे येत आहे.
यावेळी उपस्थित समन्वयकांनी शेतकऱ्यांना हरकती अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याचे कामही केले. या उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार अधिक बळकट होत असल्याचे चित्र बोरगावात पाहायला मिळाले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!