Edition

वाघी खुर्द येथे एलपीजी गॅस दुर्घटना; पाच जण गंभीर, तीन जण किरकोळ जखमी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी संतोष भालेराव :
वाशिम : रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे १८ जून ला सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅसचा भडका उडाल्याने पाच जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित घरातील एलपीजी गॅस यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गॅसने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे घरातील सदस्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. आग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नादरम्यान काही व्यक्ती भाजल्या गेल्या.
या दुर्घटनेत शेख शाहरुख शेख मेहबूब (वय ३०), अब्दुल रहमान (वय २३), जुबेर शेख रफिक (वय २५), हजरबी शेख शाहरुख तसेच सहा वर्षीय मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. तर पाच वर्षीय मुलगी व अन्य दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, अग्निशमन दल व शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनराज तायडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली. संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य राबवून आग आटोक्यात आणली.
प्रशासन व आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी जीवित व वित्तहानी टळली. सदर घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विभागामार्फत पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!