Edition

कन्या विद्या मंदिर, देसाई विद्या मंदिर आणि उर्दु विद्या मंदिर, उदगाव येथे नव विद्यार्थिनींचे उत्साहपूर्ण स्वागत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.. यामध्ये नव विद्यार्थिनींचे स्वागत, प्रभात फेरी, पहिल पाऊल, शाळापूर्व तयारी, पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट-सॉक्स वितरण तसेच नशामुक्ती प्रतिज्ञा यांचा समावेश होता.. यानंतर सर्व विद्यार्थिनींना जेवण देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली..

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सौ.दिप्ती मिथुल जाधव, श्री.मिथुल जाधव, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती सदस्या, सर्व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते..
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी व प्रेरणादायी व्हावी या उद्देशाने माझ्या परिवाराकडून सर्व विद्यार्थिनींना पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले..
तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री.अमोल चव्हाण दादा यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनःपूर्वक आभार..!
आनंदी शिक्षण, उज्ज्वल भविष्य..!!

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!