Edition

गांधीनगरातील वसंतशहा परिसरात युवकावर जीवघेणा हल्ला; “तुला संपवतो” म्हणत बेदम मारहाण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – गांधीनगरातील वसंत शहा परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून युवकाला अडवून शिवीगाळ, दमदाटी करत जीव घेण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अर्जुन भगवानदास निरंकारी (रा. वसंतशहा कॉलनी, गांधीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वसंत शहा परिसरात फिर्यादी मित्रासोबत उभे असताना जोतेष धरमकुमार वासवानी व अनुज सनी चंदवानी हे तेथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
“तू गांधीनगरमध्ये कसा फिरतोस, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादीवर अचानक हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत कपाळावर गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), ३५२, ३५२(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणातील फिर्यादी व अन्य दोन जखमी अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!