Edition

कोरोची येथे गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक; २.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती वृत्तसेवा इचलकरंजी – कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या एनडीपीएस (NDPS) क्रॅकडाऊन मोहिमेअंतर्गत शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन संशयितांना अटक केली. आरोपींकडून २ किलो २८९ ग्रॅम गांजा, आय-क्यूब मोपेड आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण २ लाख ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क) व २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १० जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास कोरोची गाव हद्दीतील चव्हाणवाडी टेकडी परिसरात नाईक मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईत आरोपींकडून सुमारे ५७ हजार २२५ रुपये किंमतीचा २ किलो २८९ ग्रॅम गांजा, १ लाख २० हजार रुपये किंमतीची आय-क्यूब मोपेड आणि ५७ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरबिंद उर्फ राजवीर सुरेंद्र सिंग (वय २४, सध्या रा. शिवाजीनगर, कोरोची), मोहसीन इर्शाद सनदी (वय २४, रा. तिरंगा कॉलनी, कबनूर) आणि सार्थक श्रीप्रसाद बिंद (वय २०, सध्या रा. लक्ष्मी मंदिरजवळ, कोरोची) यांचा समावेश आहे. यापैकी मोहसीन सनदी याच्यावर यापूर्वीही खुनासह गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोउनि महावीर कुटे व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!