Edition

मसुचीवाडीत शक्तिपीठ महामार्गाविरोधात भव्य जनआक्रोश रॅली; जमीन भूसंपादनाला एकमुखी विरोध…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात मसुचीवाडी येथे आज ग्रामस्थांच्या वतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे रॅलीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
गावातील प्रत्येक गल्लीतून काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान शक्तिपीठ महामार्गाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रॅलीनंतर हनुमान मंदिर परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत वाळवा पंचायत समिती सदस्य रूपाली सपाटे मॅडम आणि कॉम्रेड धनाजी गुरव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रस्तावित जमीन भूसंपादन प्रक्रियेविषयी आपली भूमिका मांडत ग्रामस्थांनी एकजुटीने लढा उभारण्याचे आवाहन केले.
सभेच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गासाठी होऊ घातलेल्या जमीन भूसंपादन प्रक्रियेला ठाम विरोध करण्याचा आणि हा लढा एकदिलाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!