Edition

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राची मोठे योगदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अब्दुल लाट प्रतिनिधी – स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाने महाराष्ट्रात सहकार चळवळीला मोठे बळ देऊन सहकार चळवळ रुजवण्याचा प्रयत्न झाल्याने आज ती सहकार चळवळ सर्वसामान्यांचा आधार बनुन राहिली त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला तसेच महाराष्ट्राची जी प्रगती झाली आहे त्यामध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.शरदचंद्र पवार यांनी शिरदवाड येथील कार्यक्रमात केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील होते
शिरदवाड येथील खासदार दत्ताजीराव कदम आण्णां विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी च्या शतकपूर्ती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आपल्या भाषणात शरदचंद्र पवार पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक दूरदृष्टीच्या नेत्यांनी सहकार चळवळीला पुढे नेण्याचे काम केले त्या वेळच्या नेत्यांनी मोठ्या कष्टाने या संस्था जोपासल्यामुळे आ या संस्था जनतेची सेवा करीत असताना दिसत आहेत महाराष्ट्रात सहकार चळवळ सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील दत्ताजीराव कदम, रत्नाप्पाण्णा कुंभार, बाबासाहेब खंजिरे अनंतराव भिडे ,आबासाहेब कुलकर्णी , कल्लाप्पाना आवाडे यासारख्या अनेकांनी या संस्था मोठ्या करण्यासाठी प्रयत्नशील राहीले आज संपूर्ण देशात गुजरात, बिहार ,उत्तर प्रदेश सारख्या राज्यापेक्षाही महाराष्ट्रातील साखर उद्योग भक्कमपणे उभा राहिल्याने आणि महाराष्ट्रात साखर उद्योगाचे धुर्विकरण झाल्याचे दिसते. या परिसरातील नेतृत्वाने एक चांगला विचार दिल्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होऊ शकला याचा मला अभिमान आहे असे सांगून खासदार शरद पवार आपल्या भाषणात बोलताना पुढे म्हणाले की सहकार चळवळीच्या माध्यमातून झालेल्या विकासाची नोंद घेऊन इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस कै. दत्ताजीराव कदम यांचे नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही असे सांगून हा परिसर सुजलम सुफलम करण्याचे स्वप्न ही मंडळी नेहमी पाहत होती तशी नेतृत्व संपन्न मंडळी या भागात जन्माला आली हे आपल्या दृष्टीने भाग्याचे असल्याचे सांगून कै दत्ताजीराव कदम यांच्या अखेरच्या क्षणीचा प्रसंग सांगितला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!