Edition

गांधीनगर मधील बेटिंगसहित सर्व अवैध धंदे रोखा;अन्यथा आंदोलन – करवीर तालुका शिवसेना (UBT)

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर प्रतिनिधी
उदय साळुंखे – गांधीनगर येथील भावेश तुलसानी या तरूणाने रेल्वे खाली उडी घेवून आत्महत्या का केली? या पुर्वी अनेक तरूणांनी कर्जबाजारी होवूनआत्महत्या केल्या आहेत, क्रिकेट बेटींगमुळे जर हे तरूण कर्जबाजारी होत असतील तर बेटींग घेणारे बुक्की मालक व त्यांच्या सहकार्यांच्यावर तातडीने कारवाई करावी.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापार पेठ असून येथे सर्वच जिवनाअवश्यक वस्तुंची होलसेल व रिटेल व्यापार पेठ म्हणून नाव लौकीक आहे. ही व्यापार पेठ उदयास येण्यासाठी एक पिढी हयात गेली आहे. पण आज गुटखा असेल, नशेच्या गोळ्या असतील, मावा असेल, गांजा असेल, गोवा मेट दारू असले किंवा क्रिकेट मॅचचा सट्टा असेल या दोन नंबर व्यवसायांची ही मोठी बाजार पेठ म्हणून आता या गांधीनगरचे नाव पुढे येत आहे. सद्या झालेल्या आय.पी.एल. क्रिकेट मुळे गांधीनगरातील अनेक तरूण या सट्टयामध्ये अडकली असून बेटींगची पाळेमुळे खणुन काढणेची पोलिसांनी सद्या गरज आहे. भावेश तुलसानी, वय वर्षे २२ हा त्या घरातील एकुणता एक मुलगा होता, याच्या आत्महत्या नंतर गांधीनगर मध्ये क्रिकेट सट्टयामुळे आत्महत्या अशी जोरात चर्चा आहे. गांधीनगर व्यापार पेठेतील मुल ही रात्रभर गांधीनगरमध्ये सर्व काही मिळत असल्याने मोटर सायकलने रात्रभर फिरत असतात, त्याबाबत ही कठोर असा पायबंद पोलिसांनी घालणेची गरज आहे. वाढत्या चोऱ्या, खाजगी सावकारी, मारामारी, सशस्त्र हल्ले, दारू, गुटखा, गांजा विक्री, गावठी दारू व बेटींगमुळे गांधीनगर बाजार पेठसह परिसर त्रस्त आहे तरी आपण या सर्व चालु असलेल्या बेकायदेशीर वर कारवाई करावी ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. अनिल तनपुरे, पोलीस निरीक्षकसो, गांधीनगर पोलीस ठाणे यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की, बेटिंग मुळे जर तरुण मुलांचे आयुष्य उध्वस्त होत असेल तर हे आपल्यासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आमचे शिवसैनिक स्वतःच्या अवैध व्यवसायांवर धडक देतील.
करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, गांधीनगरची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ म्हणून ओळख आहे, मात्र सध्या अवैध व्यवसायांची प्रमुख बाजारपेठ म्हणून त्याची ओळख होत चाललेली आहे त्यामुळे गांधीनगर बाजारपेठेचा लौकिक खराब होत आहे, त्यामुळे सर्वच अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करावी व गांधीनगर बाजारपेठ वाचवावी.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की गांधीनगरात सध्या अवैध व्यवसाय आढळून येत नाहीत मात्र असे व्यवसाय करणारे सापडले तर त्यांच्यावर लगेच कडक कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, जितू कुबडे, सुनील पारपानी, रामराव पाटील, विनोद रोहिडा, प्रकाश मुदुगडे, दीपक धिंग, वसंत पोवार, कैलास जाधव, शिवाजी लोहार, अजित चव्हाण, दीपक अंकल, किशोर कामरा, जितू चावला आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!