Edition

पट्टणकोडोलीच्या यशोदा शिवाजी मोठे हिने पटकावले राष्ट्रीय शालेय कुस्तीत सुवर्णपदक.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पट्टणकोडोली / प्रतिनिधी – दिल्ली येथे झालेल्या 70 व्या स्कूल नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये पट्टणकोडोली येथील छत्रपती शिवाजी तालमीची पैलवान पै. यशोदा शिवाजी मोठे हिने दमदार कामगिरी करत गोल्ड मेडल मिळवले आहे. या सुवर्ण कामगिरीबद्दल सर्वांच्या वतीने तिचा भव्य सत्कार करण्यात आला. अडचणीवर मात करून हे यश खेचून आणण्यासाठी तिला सोमनाथ कामाण्णा कोच, श्रीकांत कामाण्णा कोच तसेच तीला रामा कुशाप्पा सर (फौजी ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मायाप्पा मुधाळे, भागोजी शिरोळे, सुकुमार बोरगावे, खानदेव देवबा, प्रशांत मोठे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडावळे व तिचे वडील शिवाजी मोठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशोदाच्या या विजयाने संपूर्ण गावातून तिचे कौतुक होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!