Edition

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘Use of AI in Classroom’ विषयावर सीबीएसई प्रशिक्षणाचे आयोजन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

महाराष्ट्रातील ६० शिक्षकांचा सहभाग.

सेलू : आधुनिक शिक्षण व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) प्रभावी वापर करून अध्यापन प्रक्रिया अधिक गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानस्नेही बनविण्याच्या उद्देशाने श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के. आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेलू येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने ‘CBP : Use of AI in Classroom’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण पार पडणार आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध सीबीएसई संलग्न शाळांमधील एकूण ६० शिक्षकांनी सीबीएसई सीओई (CBSE Centre of Excellence) प्रशिक्षण पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, आयोजक प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील शिक्षकही या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात या प्रशिक्षणाबाबत उत्साह आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रशिक्षणासाठी सीबीएसईच्या वतीने दोन अनुभवी रिसोर्स पर्सन्सची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सागर राऊत (Principal, RP133704), MAEER MIT पुणे) तसेच सीताराम डी. कराड (Vice Principal), पोदार स्कूल लातूर यांचा समावेश आहे. हे दोन्ही तज्ज्ञ शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, अध्यापनातील एआयचा प्रभावी वापर, आधुनिक डिजिटल साधने आणि तंत्रज्ञानाधारित अध्ययन- अध्यापन पद्धती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
आजच्या डिजिटल युगात एआय तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत आहे. शिक्षकांना एआयची उपयुक्तता समजावून सांगणे, अध्यापन अधिक प्रभावी, कृतीशील व विद्यार्थी-केंद्रित बनविणे, तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रेरणा लाभत आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजा ओळखून शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्यांना नवनवीन शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि संस्थेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे यासाठी डॉ. रोडगे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या दूरदृष्टीतूनच अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे.
प्रशिक्षणाच्या उत्तम नियोजनासाठी प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि संपूर्ण कर्मचारीवर्ग विशेष मेहनत घेत आहेत. प्रशिक्षणासाठी आवश्यक सभागृह, बैठक व्यवस्था, तांत्रिक सुविधा, शैक्षणिक साहित्य, सहभागी शिक्षकांचे स्वागत व इतर सर्व व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. बाहेरील विविध शाळांमधून येणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षणाचा उत्तम अनुभव मिळावा, यासाठी शाळेतील सर्वजण समन्वयाने कार्यरत आहेत.
‘Learn, Upgrade and Excel’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षण उपक्रम केवळ शिक्षकांच्या ज्ञानात भर घालणारा नसून, भविष्यातील तंत्रज्ञानाधारित शिक्षण व्यवस्थेसाठी शिक्षकांना सक्षम करणारा ठरणार आहे. सेलूसारख्या शहरात महाराष्ट्रातील विविध सीबीएसई शाळांतील शिक्षकांना एकत्र आणून आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!