
विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.*
मलिकवाड (ता.चिकोडी) येथील रहिवासी कै.अक्काताई कल्लाप्पा गजबर (वय १०१) यांचे सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मलिकवाड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै.अक्काताई गजबर यांनी वयाची १०१ वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या निधनाने गजबर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा रक्षा विसर्जन विधी कार्यक्रम बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता होणार आहे.









