Edition

रासायनिक खत वाटपासाठी ॲप : १५ डिसेंबरपासून शेतकरी घरबसल्या करू शकणार बुकिंग*

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

बेळगाव : दि. १५ पासून शेतकरी घरबसल्या मोबाईल ॲपद्वारे रासायनिक खत बुक करू शकणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे संयुक्त संचालक *एच. डी. कोळेकर* यांनी दिली आहे.

यासंबंधी प्रसिद्धी पत्रक जारी करताना त्यांनी सांगितले की, यासाठी *‘फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टिम’* विकसित करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्याचा आधार क्रमांक, जमिनीची माहिती आणि शेतकऱ्याची ओळख यांची माहिती जोडण्यात येत आहे. ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या पीक आणि जमिनीच्या माहितीनुसार आधारवर २-३ दिवसांच्या आत आवश्यक खत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून आधार क्रमांक नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक रासायनिक खताची माहिती मिळवून पावती मिळवता येईल, असेही त्यांनी सांगितले.

*– अनिलकुमार डेक्कण्णवर, सदलगा (NEJ)*

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!