Edition

*पुण्यात ‘रेफकोल्ड इंडिया २०२६’ प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन* *कोल्ड चेनच्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे : रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील दक्षिण आशियातील भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद ‘रेफकोल्ड इंडिया २०२६’चे उद्घाटन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे झाले. इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ISHRAE) यांच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनात २०० हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षम प्रणाली आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले आहे. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल उगले-तेली, कृषी आयुक्त सुरेश मांढरे, साखर आयुक्त संजय कोलते, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, ISHRAEचे अध्यक्ष डॉ. सरवानन, रेफकोल्ड इंडिया २०२६चे अध्यक्ष अरविंद सुरंगे, सुनील पवार, अमन किर्लोस्कर, दीपक वाणी, रमेश परांजपे, चंद्रशेखर, संयोजक वीरेंद्र बोराडे आणि सहसंयोजक नंदकिशोर कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, की सर्वच क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या साठवणुकीची योग्य व्यवस्था नसल्याने त्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. कोल्ड चेन व्यवस्थेच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रदर्शने, उद्योग, तंत्रज्ञान आणि शासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास उद्योगनिर्मितीला चालना मिळेल आणि नवउद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण होतील.

अरविंद सुरंगे म्हणाले, की रेफ्रिजरेशन आणि संलग्न उद्योगांतील उत्पादक कंपन्या, तज्ज्ञ अभियंते, डिझायनर्स, सल्लागार, कंत्राटदार आणि शैक्षणिक संस्थांचे भक्कम जाळे असल्यामुळे पुण्याला देशाची ‘रेफ्रिजरेशन कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. या क्षेत्राच्या विकासात ISHRAEच्या पुणे विभागाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
ISHRAEचे अध्यक्ष डॉ. सरवानन यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी संस्थेतर्फे पाच लाख रुपयांची देणगी देण्याची तसेच तीन पीएच.डी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली.
या प्रदर्शनात रेफ्रिजरेशन, कोल्ड चेन, ऊर्जा कार्यक्षम प्रणाली, स्मार्ट तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांसह विविध उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले आहे. याशिवाय तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद, पॅनेल चर्चा, रेफकोल्ड पुरस्कार, ग्लोबल पोस्टर स्पर्धा तसेच महिला सदस्य आणि उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्री चेतन ठाकूर, डॉक्टर नितीन देवधर श्रीयुत अमित गुलवडे, विमल चावडा, आशुतोष जोशी, सुबोध मुर्केवार यांनी मोठे योगदान दिले. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक वीरेंद्र बोराडे यांनी केले. सुभाष खनाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे प्रदर्शन २१ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

शिराळा. मेणीखोऱ्यातील मोबाईल नेटवर्कसाठी मेणी फाट्यावर तीन तास रास्ता रोको. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आक्रमक; २४ तास नेटवर्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा..

traffic tail

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

error: Content is protected !!