Edition

सेलू कृषी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला घातला पुष्पहार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू तालुका कृषी कार्यालयाला मागील दीड ते दोन वर्षापासून कायमचा कृषी अधिकारी नाही. या कार्यालयाचा कारभार प्रभारीवर चालत आहे. त्यातच अधिकारी नसल्यामुळे अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. अगोदरच दुष्काळात अडकलेला शेतकरी या कार्यालयात चकरा मारून बेजार झाला आहे. काही शेतकऱ्यांनी शिवसेना नेते जयसिंग शेळके यांना फोन करून या कार्यालयात जबाबदार अधिकारी नाही व ज्वारी, हरभऱ्याची बियाणे आली आहेत. परंतू कार्यालयात गेलो असता तिथे जबाबदार अधिकारी नव्हता याचा निषेध म्हणून कृषी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने हार घालून निषेध करण्यात आला. यावेळी जयसिंग शेळके, वैभव वैद्य, दत्ता आंधळे, डॉ विजय काकडे, श्याम बोडखे, अशोक बोराडे,शिवाजी राऊत, कृष्णा आंधळे, परमेश्वर साखरे, भागवत राऊत, हरी बोडखे, गणेश आंधळे, नागेश आंधळे, मंचकराव काकडे, बाबासाहेब काकडे, राजेश वायगुंडे, अशोक साखरे व अनेक शेतकरी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

शिराळा. मेणीखोऱ्यातील मोबाईल नेटवर्कसाठी मेणी फाट्यावर तीन तास रास्ता रोको. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आक्रमक; २४ तास नेटवर्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा..

traffic tail

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

error: Content is protected !!