Edition

समाज विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची – नवलकिशोर राम आयुक्त पुणे मनपा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आयोजित राज्यस्तरीय अभियंता संमेलनात उदघाटक म्हणून बोलताना नवल किशोर राम, आयुक्त पुणे मनपा यांनी चांगले अभियंते ही समाजाची संपत्ती असून विकास कामातील तंत्रज्ञानाबरोबरच अभियंत्यांनी समाजाच्या विकास कामात देखील महत्तवपूर्ण भूमिका निभवावी, जेणे करून उपेक्षित समाजाला मदतीचा हात मिळेल असे मत व्यक्त केले. शिवाजीनगर, पुणे येथील इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंजि. धनराज तावडे माजी सदस्य, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत सरकार, इंजि. भरतकुमार बावीस्कर, अधीक्षक अभियंता सा.बां. मंडळ, पुणे, इंजि. जी. एम. कंधारे, माजी सचिव स.बां. विभाग, महाराष्ट्र राज्य, इंजि. प्रदिप नगरारे, जेष्ठ अभियंता, नागपूर हे होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. कुलदीप रामटेके मा. अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग हे होते. या वर्षाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याची सुरक्षा व पाण्याची काटकसर करण्यासाठी बानाई ही अभियंत्यांची

संघटना समाजामध्ये पुढे राहून काम करेल अशी घोषणा कुलदीप रामटेके यांनी केली.

दुपारच्या सत्रात राजीव नंदकर अतिरिक्त जिल्हाधिकारी व प्रसिध्द लेखक यांचे समाज विकासात अभियंत्यांची भूमिका या विषयावर प्र व्याख्यान झाले. संमेलनास महाराष्ट्रातील १९ जिल्हयतील सुमारे अभियंत्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.

दुपारच्या सत्रात राजीव नंदकर अतिरिक्त जिल्हाधिकारी व प्रसिध्द लेखक यांचे समाज विकासात अभियंत्यांची भूमिका या विषयावर प्रभावी व्याख्यान झाले. संमेलनास महाराष्ट्रातील १९ जिल्हयतील सुमारे १५० अभियंत्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.

पांडुरंग शेलार, अध्यक्ष बानाई पुणे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आपण स्वातंत्र्याचा व राज्यघटनेचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना संविधानानुसार शोषीत व वंचित घटकांना अपेक्षित लाभ व न्याय मिळण्यासाठी शासनाने कटिबध्द राहिले पाहिजे अशी आशा व्यक्त केली. महाराष्ट्र शासन सेवेतील सर्वच अधिकाऱ्यांना अनेक वर्षे रखडलेले पदोन्नतीमधील आरक्षण लागू करावे. शासनाने खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करावे तसेच मागासवर्गीयांमधील बेरोजगार अभियंत्यांना व व्यावसायिकांना शासकीय तसेच निमशासकीय क्षेत्रांमध्ये ५% आरक्षण ठेकेदारीमध्ये देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या या संमेलनामध्ये करण्यात आल्या.

आभार प्रदर्शन चंद्रशेखर जावळे यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

शिराळा. मेणीखोऱ्यातील मोबाईल नेटवर्कसाठी मेणी फाट्यावर तीन तास रास्ता रोको. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आक्रमक; २४ तास नेटवर्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा..

नणदी व बेडकिहाळ येथील शेतकऱ्यांचे एकरी १०० टन उसाचे विक्रमी उत्पादन! चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखाना व यु.पी.एल. कंपनीच्या संयुक्त ऊस विकास योजनेला यश; आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ.

traffic tail

शिराळा. मेणीखोऱ्यातील मोबाईल नेटवर्कसाठी मेणी फाट्यावर तीन तास रास्ता रोको. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आक्रमक; २४ तास नेटवर्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा..

नणदी व बेडकिहाळ येथील शेतकऱ्यांचे एकरी १०० टन उसाचे विक्रमी उत्पादन! चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखाना व यु.पी.एल. कंपनीच्या संयुक्त ऊस विकास योजनेला यश; आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ.

error: Content is protected !!