Edition

गडमुडशिंगीत विद्यार्थी दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर शिक्षणामुळे गुलामगिरी संपली – प्रा. मांगले यांचे प्रतिपादन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे

गडमुडशिंगी, ता. करवीर : येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले हे होते.

कार्यक्रमात बोलताना प्रा. मांगले म्हणाले, “जगामध्ये सर्वाधिक बुद्धिमान असणारी व्यक्ती आमच्या बहुजन समाजाची मार्गदर्शक आहे. यापेक्षा दुसरा मोठा आनंद आणि समाधान नाही.”

ते पुढे म्हणाले, “हजारो वर्षांची गुलामगिरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे संपली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी संविधान लिहून महिला व बहुजन समाजावर अनंत उपकार केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे.”

यावेळी बोलताना रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी, “त्या काळात अस्पृश्य मुलांना शाळेत वर्गात बसू दिले जात नव्हते. बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर फळीवर बसावे लागत होते. पाणी प्यायला वेगळा माठ होता, शिपाई वरून पाणी ओतायचा. तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही. शिक्षण हा हक्क आहे, भीक नाही, हे सांगणारा आजचा विद्यार्थी दिवस आहे,” असे मत व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापक बाबासाहेब सुर्वे, करवीर अर्जुन कांबळे महासचिव,अर्जुन गोंधळी महासचिव, गणेश कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पाटील मॅडम यांनी केले.

यावेळी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक गुंडू शिंदे, करवीर संघटक शिवाजी कांबळे, माने सर, संदीप गोंधळी, लोखंडे सर, अमोल कांबळे, गुरव मॅडम, शिंदे मॅडम, झांबरे सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारा अप्रतिम किल्ला. साताऱ्याच्या बाल शिवशिलेदारांची अनोखी कलाकृती, तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक या बंधूंनी साकारला ऐतिहासिक गड-किल्ल्याचा देखणा नमुना

कष्टकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आमदार सदाभाऊ खोत यांनी जपली माणुसकी! रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजुरांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप; गावी जाता न आलेल्या विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला दिवाळीचा आनंद.

traffic tail

error: Content is protected !!