Edition

कष्टकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आमदार सदाभाऊ खोत यांनी जपली माणुसकी! रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजुरांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप; गावी जाता न आलेल्या विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला दिवाळीचा आनंद.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून माणुसकी जपण्याचा, नाती जोडण्याचा आणि आनंद वाटण्याचा सण आहे. याच भावनेतून आमदार सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजूर बांधवांसोबत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली.
आपल्या कुटुंबापासून दूर राहून कष्टाच्या जोरावर संसाराचा गाडा ओढणाऱ्या बांधकाम मजुरांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलावा, त्यांच्या श्रमांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने आमदार खोत यांच्या हस्ते बांधकाम मजुरांना दिवाळी फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कष्टकरी बांधवांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
यावेळी शाळेतील काही विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी जाऊ शकले नव्हते. अशा विद्यार्थ्यांनाही सोबत घेत आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यासोबत दिवाळीचा फराळ केला. विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करत त्यांच्या आनंदात सहभागी झाले. कुटुंबापासून दूर असलेल्या या विद्यार्थ्यांना आपुलकीचा आणि कुटुंबीयांच्या सहवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.
समाजातील कष्टकरी घटकांच्या श्रमांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम माणुसकीचे दर्शन घडवणारा ठरला. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटविण्यातच सणाचे खरे समाधान असते, हा संदेश आमदार सदाभाऊ खोत यांनी या उपक्रमातून दिला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारा अप्रतिम किल्ला. साताऱ्याच्या बाल शिवशिलेदारांची अनोखी कलाकृती, तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक या बंधूंनी साकारला ऐतिहासिक गड-किल्ल्याचा देखणा नमुना

कष्टकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आमदार सदाभाऊ खोत यांनी जपली माणुसकी! रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजुरांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप; गावी जाता न आलेल्या विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला दिवाळीचा आनंद.

traffic tail

error: Content is protected !!