Edition

देवगाव फाटा एसबीआय शाखेचा ग्राहक पंचायतीतर्फे गौरव.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

एका दिवसात १०५ पीककर्जाचे वाटप ; १ कोटी २ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

सेलू : दि. ७ नोव्हेंबर देवगाव फाटा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेने केलेल्या आगळ्यावेगळ्या आणि सेवाभावी कार्याचा आज सायंकाळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सेलू तालुका शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला.बँकेच्या शाखेने एकाच दिवसात तब्बल १०५ पीककर्जाच्या फाईल्स पूर्ण करून एकूण १ कोटी २ लाख रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केले. हे काम अवघड असले तरी अत्यंत मोलाचे ठरले. दीपावलीसारख्या मंगल पर्वाच्या पार्श्वभूमीवर हे कार्य अधिकच अर्थपूर्ण ठरले. सणाच्या आनंदात शेतकऱ्यांच्या हाती आर्थिक आधार देणे, हीच खरी दिवाळीची भेट ठरली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या उल्लेखनीय कामगिरीमागे शाखेचे ब्रांच मॅनेजर संदीप मेश्राम यांचे नियोजन आणि मार्गदर्शन तसेच सहयोगी शिवशंकर सरकटे, भागवत कटारे, परमेश्वर मूधवार, पंजाब मदने यांचे अथक परिश्रम आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी दिवसभर अखंडपणे काम करून शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून दिले.
ग्राहक पंचायत ही नेहमीच ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारी संघटना आहे. मात्र त्याचबरोबर जे अधिकारी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून ग्राहकांना आपुलकीने, तत्परतेने आणि प्रामाणिक पणे सेवा देतात, त्यांच्या कार्याचे कौतुक करणे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे, हेही ग्राहक पंचायतीचे पवित्र कर्तव्य आहे. त्याच जाणिवेतून सेलू शाखेने देवगाव फाटा शाखेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या सेवाभावी कार्याला सन्मानपूर्वक वंदन केले.यावेळी बाबू आप्पा साळेगावकर, सकाळचे पत्रकार दिलीप मोरे, ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष जाधव सतीश, ग्राहक पंचायतचे तालुका सचिव गंगाधर कान्हेकर, तालुका सहसचिव सुनील गायकवाड यांच्या हस्ते ब्रांच मॅनेजर संदीप मेश्राम व त्यांचे सहकारी शिवशंकर सरकटे, भागवत कटारे, परमेश्वर मूधवार, पंजाब मदने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.बँकेच्या या तत्पर सेवेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!