Edition

लोक निवडणुकीत पाडतात, पण शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर मात्र राजू शेट्टीच असतात ! ६१ तासांच्या राष्ट्रीय महामार्ग जामनंतर शेतकऱ्यांना टनाला ₹५०० जास्तीचे मिळणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वार्ताहर : अनिलकुमार डेक्कण्णवर, सदलगा
लोकं राजू शेट्टींना निवडणुकीला पाडतात, पण जेव्हा ऊसदरासाठी आंदोलनाची वेळ येते तेव्हा हा माणूस त्याच लोकांसाठी रस्त्यावर असतो.

जेव्हा दूध दरासाठी आंदोलन करायचं असतं तेव्हाही हा माणूस शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर असतो.

काल ६१ तास नॅशनल हायवे जाम केल्यानंतर राजू शेट्टी ज्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत, त्यांना प्रति टन ₹५०० रुपये जास्तीचे मिळणार आहेत.

आता काही जणांच्या भाषेत ही अराजकता असेल, पण कारखानदार शेतकऱ्यांची गुंडाळपट्टी ₹३५०० वर करणार होते. आता त्याच शेतकऱ्यांना प्रति टन ₹४००० रुपये मिळणार आहेत.

याच ऊसाला मराठवाड्यात प्रति टन जवळपास ₹३१०० रुपये भाव मिळत आहे, म्हणजे टनाला ₹९०० रुपयांचे नुकसान आहे. याचे कारण म्हणजे मराठवाड्यात राजू शेट्टींसारखा एकही आंदोलन करणारा शेतकरी नेता नाही.

भारतात विनंती, निवेदन किंवा फक्त चर्चा करून न्याय मिळत नाही. त्यासाठी आंदोलनाचा खुट्टाच ठोकावा लागतो, तेव्हाच इथली व्यवस्था हालते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा हा नेता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा खरा कैवारी ठरला आहे, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

इचलकरंजी येथे 15 नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचा भव्यवधू-वर पालक परिचय मेळावा.मधुस्वप्न’ सूचक केंद्राच्या वतीने चौथ्या मेळाव्याचे आयोजन; महाराष्ट्र व कर्नाटकातील समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन.

traffic tail
error: Content is protected !!