Edition

ईश्वरपुरात जागेच्या कंपाउंडवरून वाद; दोघांना मारहाण लोखंडी पाईपने हल्ला केल्याचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर येथील निनाईनगर परिसरात खरेदी केलेल्या जागेला कंपाउंड घालण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांना मारहाण केल्याची घटना दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राधेय विनोद शहा (वय ४२, रा. गांधी चौक, ईश्वरपूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेय शहा व त्यांचे भाऊ अमेय विनोद शहा हे निनाईनगर येथील सर्वे गट क्रमांक ४८/२ मधील त्यांनी खरेदी केलेल्या जागेला कंपाउंड घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी संकेत संजय शहा याने राधेय यांच्या उजव्या पायावर लाथ मारल्याचा, तर कल्याणी संकेत शहा हिने हातातील लोखंडी पाईपने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मारून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तसेच, संकेत शहा याच्यासह अन्य आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून संगनमताने राधेय शहा व त्यांचे भाऊ अमेय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी संकेत संजय शहा, सुयोग संजय शहा, कल्याणी संकेत शहा, सोनल सुयोग शहा, संजय पोपटलाल शहा आणि शास्दा संजय शहा (सर्व रा. निनाईनगर, ईश्वरपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०८/२०२६ अन्वये १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ४२ मिनिटांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सुरुवातीचा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!