Edition

हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा! आ अमल महाडिक, आ अशोक माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : पावसाने ओढ दिल्याने हातकणंगले तालुक्यातील शेतीपिके धोक्यात आली असून, तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाणी उपशावर निर्बंध असल्यामुळे पिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही तांत्रिक त्रुटींमुळे हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झाला नसल्याचे निदर्शनास आणून देत, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तालुक्याचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.

तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!