Edition

कोल्हापूर जिल्ह्यात आज १२ ऑक्टोबरला पारंपरिक वेशभूषा दिवस; शाळांमध्ये दसरा महोत्सवाचा उत्साह!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सव २०२६ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी ‘पारंपरिक वेशभूषा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सूचना जारी केल्या आहेत.

राज्य शासनाने ‘कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव’ हा राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला असून, या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या दिवशी शाळांच्या नियमित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नसून, दैनंदिन अध्यापनाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांसह शाळेचे नाव नमूद करून ते संबंधित तालुक्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!