
संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी – चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी आणि बेळगाव जिल्हा व कुंदवाड संस्थानातील कुणबी शोध मोहीम सुरू करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी सकल मराठा समाज, चंदगड तालुक्याच्या वतीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तुर्केवाडी येथील महादेराव वांद्रे कॉलेजमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा होणार आहे:
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सखोल चर्चा.
बेळगाव जिल्हा व कुंदवाड संस्थानातील कुणबी नोंदीच्या शोध मोहिमेबाबत विचारविनिमय.
चंदगड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











