Edition

चिंचवाडमध्ये शॉर्टसर्किटचा तडाखा: २५ लाखांचे नुकसान, जळालेल्या उसाचे करायचे काय? शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर : प्रतिनिधी
उदय साळुंखे

चिंचवाड ता. करवीर येथील नदी भाग

परिसरातील फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने आठ ते दहा एकरांतील ऊस खाक झाला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेत डीपीही जळाली. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी नदी भाग परिसरात असलेल्या डीपीत शॉर्टसर्किट झाल्याने त्याच्या ठिणग्या उसाच्या फडात पडल्या. दुपारच्या वेळी वेगाच्या वाऱ्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ही बाब एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी अन्य शेतकरी व ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

‘महावितरण’चे कर्मचारी व शेतकरी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते; पण आग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी एका शेतातील ऊस तोडून आग खंडित केल्याने पुढील जवळपास ५० एकर क्षेत्र वाचले. गावातील वीस शेतकऱ्यांचा आठ ते दहा एकरमधील ऊस खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

कारखाने सुरू नसल्याने जळालेल्या उसाचे करायचे काय, हा प्रश्न बाधित शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

गांधीनगर ‘महावितरण’चे कनिष्ठ अभियंता सतीश वाळके, गोरख रानगे, किरण पुजारी, नारायण कोळी, बाहुबली पाटील, वैभव कोळी, स्वप्निल पाटील, आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!