
चंदगड : नागनवाडी (ता. चंदगड) येथील उद्योजक पांडुरंग रुक्मणा गावडे (वय ५०) यांचे रविवारी, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावडे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. ते कोरज (ता. चंदगड) येथील बालाजी काजू इंडस्ट्रीजचे मालक होते.
त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
गावडे यांच्या निधनाने परिसरातील सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.











