Edition

यासेर सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूल सेलू येथे ‘रोड सेफ्टी’वर आधारित रंगभरण व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी

सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर (जासिर) उर्दू व सेमी इंग्लिश प्रायमरी स्कूल, गुलमोहर कॉलनी, सेलू येथे आज शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी वाहतुकीच्या नियमांवर (रोड सेफ्टी) आधारित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सिनियर केजी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या एकूण ५१० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात गट ‘अ’ मधून ९० विद्यार्थी, गट ‘ब’ मधून १०० विद्यार्थी, गट ‘क’ मधून १२० विद्यार्थी, गट ‘ड’ मधून १०५ विद्यार्थी आणि गट ‘इ’ मधून ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रमुख उपस्थिती व उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण रहीम खान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कास्मी तहसीन, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान, तसेच केंद्रप्रमुख विजय चिकटे आणि विजय तुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रकला स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून सय्यद अमन यांनी काम पाहिले, तर त्यांना खान तमन्ना, पठाण नजमा, अन्सारी शोएब आणि सय्यद अजीम यांनी सहकार्य केले.
वाहतूक नियमांच्या फलकांचे अनावरण स्पर्धेच्या समाप्तीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहतुकीचे विविध नियम दर्शवणाऱ्या माहितीपूर्ण बॅनर व फलकांचे अनावरण करण्यात आले. हे बॅनर शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या जनजागृतीसाठी लावण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान व फिरोज खान पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानवी आयुष्यात नियमांचे महत्त्व आणि विशेषतः रस्त्यावरून चालताना व वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे, याविषयी त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पठाण रहीम खान यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “भावी पिढीला जर बालपणापासूनच वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून दिली, तर भविष्यात हेच विद्यार्थी जबाबदार आणि उत्कृष्ट नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडतील.”
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पठाण सीमा, सय्यद आरेफ, शेख इर्शाद, सय्यद झीशन, फरहान खान व सय्यद इम्रान यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचा आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचा संदेश देण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!