Edition

डॉ. संदीप वाटेगावकर यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सातारा : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक तथा रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप राजाक्का भास्कर वाटेगावकर यांना अविष्कार फाउंडेशन, इंडिया या संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्स, मुंबई च्या संचालिका व जिल्हा परिषद सदस्या वृषाली चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. वाटेगावकर यांनी हा पुरस्कार पत्नी प्राजक्ता आणि कन्या सई यांच्यासमवेत स्वीकारला. यावेळी अविष्कार फाउंडेशन, इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ.वाटेगावकर यांच्या संशोधनाला भारत, जर्मनी व युके सरकारची मिळून 6 पेटंट प्राप्त झाले असून त्यांना अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक शात्रज्ञांच्या यादीत स्थान मिळाले आहे. डॉ. वाटेगावकर यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांचे ५० हून अधिक संशोधनपर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, त्यांनी ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले आहे. त्यांच्या संशोधनकार्याची दखल घेऊन अमेरिका, दक्षिण कोरिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

डॉ. वाटेगावकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण बोरगाव हायस्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर हायस्कूल, ईश्वरपूर येथे घेतले. त्यांनी बी.एस्सी. पदवी के. बी. पी. महाविद्यालय, ईश्वरपूर येथून प्राप्त केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून रसायनशास्त्र विषयातील एम.एस्सी. पदवी आणि शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली.
डॉ. संदीप वाटेगावकर म्हणाले, “हा राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान आहे. हा पुरस्कार माझ्या शैक्षणिक व संशोधन कार्याची पोचपावती असून, यापुढेही शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंबीय, किसन वीर महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान आहे. हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो.”
या पुरस्काराबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर , सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!