
बेडकिहाळ सारख्या ग्रामीण भागात सरकारी शाळेत शिक्षण घेऊन गोवा राज्यात उद्योग व्यवसायासह विविध क्षेत्रात गरुड झेप घेतलेल्या, बेडकिहाळ येथील चंद्रकांत भोजे पाटील यांनी गोवा पणजी येथे लॉ फर्म चे उद्घाटन
तमिळूनाडूचे राज्यपाल,गोव्याचे रहिवाशी राजेंद्र आर्लेकर यांचे चिरंजीव ॲड अमोघ आर्लेकर व निवृत्त न्यायाधीशा मंजुळा चल्लूर यांचे चिरंजीव ॲड वंशी कृष्ण यांना एकत्रित आणून गोवा येथील मातीस लुईस गार्डन येथे लॉ फॉर्म च्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,तर या फॉर्म मध्ये बेडकिहाळचे रहिवाशी असलेले चंदू पाटील यांचे चिरंजीव सम्मेद पाटील यांना हि सहभाग करून घेण्यात आले आहे. या लॉ फर्म चे उद्घाटन मुख्य मंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या सह प्रमुख उपस्थित निवृत्त न्यायाधीशा मंजुळा चल्लूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मंजुळा चल्लूर म्हणाल्या सध्या युवकांच्या साठी सर्वच क्षेत्रात दिवसेदिवस नाविन्य पूर्ण संधी चालून येत आहेत. तर आजचे युवक येणाऱ्या संधीच सोण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खरोखरच युवकांच्या बाबतीत हि कौतुकाची बाब आहे. आपल्या करियर साठी आई वडिलांच्या सह गुरुजनांचा आशीर्वाद मोलाचा व महत्वाचा आहे.
असे मत निवृत्त न्यायाधीशा श्रीमती मंजुळा चल्लुर , यांनी व्यक्त केले.
शनिवारी तारीख 5 रोजी पणजी गोवा येथील मातीस लुईस गार्डन येथे लॉ फॉर्मचे उद्घाटन झाले.
या वेळी त्यांनी बेडकिहाळ सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन स्वकर्तुत्वाने घडलेले युवक चंद्रकांत पाटील यांच्या विशेष आय टी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्या बद्दल गौरव व्यक्त केल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री. डॉ प्रमोद सावंत यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते
स्वागत सम्मेद पाटील यांनी केले. या प्रसंगी आनंद मुत्ताली, वंशी कृष्णा सी. त्याग थिम्मन्ना व उपस्थित मान्यवरांचा सत्कार चंदू पाटील, व अमोघ आर्लेकर
यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी गोवा , कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.










