Edition

दुष्काळामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबवल्या; कोल्हापूर जिल्हा बँकेसह हजाराहून अधिक संस्थांना फटका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेसह राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील सुमारे एक हजारहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबणीवर पडणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर हरकतीही आल्या होत्या आणि त्यावर सुनावणीही पार पडली होती. गुरुवार (ता. २९) पर्यंत यावर निकाल येणार होता. मात्र, सरकारने निवडणूकच पुढे ढकलल्याने या प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!