Edition

कानूर खुर्दच्या उपसरपंचपदी भाजपचे विशाल गावडे विजयी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी

कानूर खुर्द (ता. चंदगड) : कानूर खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते विशाल विठ्ठल गावडे यांनी एका मताच्या फरकाने विजय मिळविला. या विजयामुळे भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच गुंडोपंत गणेश कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच गुंडोपंत गणेश कवाडी होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कांबळे, वैशाली गावडे, अंधिनी कांबळे, पोलीस पाटील संदीप चांदेक, ग्रामसेवक अंकुश पाटील तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर बालाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत विशाल गावडे यांनी बाजी मारत आपल्या नावावर विजयाची मोहोर उमटवली. मतदानानंतर समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. युवा नेतृत्वाला संधी मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी संदीप झेंडे,बाळाजी पाटील, सागर सुतार, अनंत झेंडे, संजय गावडे, एकनाथ गावडे, सुदास गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम गावडे, माजी सरपंच देवेंद्र नांदकर, शिलू गावडे, रामचंद्र बरागावकर, शिवाजी धारगावकर, संभाजी सावंत, रमेश सावंत, शंकर मोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल गावडे यांच्या विजयाचे ग्रामस्थ व समर्थकांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाकडून गावाच्या विकासासाठी मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी, रस्ते, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि इतर विकासकामांना प्राधान्य देऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

*प्रतिक्रिया*

विशाल गावडे म्हणाले, “ग्रामस्थांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे काम करणार असून कानूर खुर्दच्या विकासाला प्राधान्य देणार आहे.”

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!