Edition

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उदगाव येथे आरोग्य व मार्गदर्शन शिबिर..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उदगाव : विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे, तसेच त्यांना आरोग्य, स्वच्छता आणि पोषणाबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने उदगाव येथील कन्या विद्या मंदिर, देसाई विद्या मंदिर व उर्दू विद्या मंदिर येथे विशेष आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता या शिबिर संपन्न झाले असून यामध्ये विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी, डोळे, दात व सामान्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आली.. यासोबतच विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छता तसेच आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन केले गेले..

‘निरोगी विद्यार्थी – सक्षम विद्यार्थी – उज्ज्वल भविष्य’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे..

या उपक्रमाचे आयोजन सौ. दिप्ती मिथुल जाधव, सदस्या पंचायत समिती शिरोळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर आणि उदगाव, खासदार धैर्यशील दादा प्रेमी आणि यड्रावकर सोशल फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक होत आहे..

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

traffic tail

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील ———– आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

error: Content is protected !!