Edition

यासेर उर्दू प्रायमरी सेमी इंग्लिश मध्ये नात खवाणी स्पर्धेचे आयोजन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल मध्ये नात खवाणी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली पासून ते सातवी पर्यंतच्या एकूण 68 विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर आवाजात नात गायन केले हे स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गट इयत्ता पहिली दुसरी, दुसरा गट इयत्ता तिसरी चौथी व तिसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी प्रत्येक गटातून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे नात गायन केले स्पर्धाचे सर्व नियोजन सहशिक्षिका पठाण नजमा व माव्या हाश्मी यांनी पाहिले तर तर तहमीना मॅडम, सीमा पठाण.सय्यद इम्रान यांनी सर्वेक्षकांची जबाबदारी पार पाडली नाद गायन स्पर्धा ची सुरुवात इयत्ता सहावीच्या विद्यार्थी उमेर जाकेर ह्याच्या खीरत नंतर झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फिरोज खान पठाण हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी फातिमा पाशा खान पठाण व सय्यद अफिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सय्यद अमन, शेख साजिद, सय्यद अझीम, शेख इर्शाद, सय्यद आरेफ आदींनी सहकार्य केले.शोएब अन्सारी यांनी आभार प्रदर्शन केले. ह्यावेळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व नात गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!