Edition

गोकुळ शिरगाव ग्रामपंचायाती मध्ये इंटेंसिफाइड कार्यक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

करवीर: प्रतिनिधी
उदय साळुंखे

गोकुळ शिरगाव ग्रामपंचायाती मध्ये
इंटेंसिफाइड माहिती, शिक्षण ,संवाद या कार्यक्रमातून एच. आय. व्ही/ एड्स, गुप्तरोग, क्षयरोग, कावीळ या विषयावर आरोग्य जनजागृती करण्यात आली. रिस्क एस्मेंट वर जोर देऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाची गावात व्याप्ती वाढविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
आरोग्य प्रतिबंध विभाग, गोकुळ शिरगाव, संपूर्ण सुरक्षा केंद्र ,सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर, सुरक्षा क्लिनिक, सीपीआर हॉस्पिटल ,कोल्हापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरीवाडी,ग्रामपंचायत गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त सहयोगाने ग्रामपंचायत पदाधिकारी व आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या साठी इंटेंसिफाईड IEC कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे,उपसरपंच नीता एरंडोले,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी संदीप धनवडे, आरोग्य सेवक सुनील जाधव, सुरक्षा क्लिनिक समुपदेशिका श्रिया पाटील, संपूर्ण सुरक्षा केंद्रच्या सेंटर मॅनेजर दीपाली सातपुते,अभिजित माने,समुपदेशक प्रल्हाद कांबळे, संध्या कांबळे, संकेत सावंत, पूजा पाटील,यांच्यासह आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी केले.आभार प्रल्हाद कांबळे यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!