Edition

खोतवाडी हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी यासीन मुजावर सरांची नियुक्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी, प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील खोतवाडी हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी शाळेचे पर्यवेक्षक यासीन मुजावर सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर मुजावर सरांची नियुक्ती करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव, विद्यार्थ्यांशी असलेले आपुलकीचे नाते तसेच शाळेच्या विकासासाठी असलेली त्यांची सकारात्मक भूमिका यामुळे त्यांच्यावर मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुजावर सरांच्या नियुक्तीचे खोतवाडी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी स्वागत केले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह विविध उपक्रमांना त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन जबाबदारीसाठी यासीन मुजावर सरांना सर्व स्तरांतून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!