Edition

बच्चे सावर्डे सुपुत्राची उत्तुंग भरारी; कु.हर्षद जोतीराम नरुटे याची IDBI बँकेच्या ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदी निवड.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बच्चे सावर्डे दि.23.
जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर बच्चे सावर्डे येथील हर्षद जोतीराम नरुटे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याची ‘आयडीबीआय’ (IDBI) बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण सावर्डे परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढत हर्षदने हे यश मिळवले आहे. कोणत्याही यशासाठी शॉर्टकट नसतो, तर प्रामाणिक प्रयत्न आणि अभ्यासातील सातत्यच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते, हे त्याने आपल्या या उत्तुंग कामगिरीने सिद्ध करून दाखवले. बँकेच्या कठीण निवड प्रक्रियेत, लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांवर उत्तम कामगिरी करत त्याने हे स्थान पटकावले आहे.
कुटुंबीयांकडून आनंदाश्रू अन् ग्रामस्थांकडून कौतुक
हर्षदच्या यशामुळे नरुटे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या या यशाचे वृत्त समजताच स्थानिक नागरिक, आणि स्नेहीजनांनी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावरच मला हे यश मिळवता आले. माझ्या या प्रवासात आई-वडील आणि शिक्षकांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले,” अशी प्रतिक्रिया हर्षद नरूटे यानी याप्रसंगी व्यक्त केली.
त्याचे प्राथमिक शिक्षण पाचवे ते सातवी विद्या मंदिर सावर्डे तर आठवी ते दहावी श्रीमती भारा यादव हायस्कूल सावर्डे येथे तर उच्च शिक्षण डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झाले त्याच्या यशामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना मोठी प्रेरणा मिळाली असून, सावर्डेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!