Edition

महाविद्यालयालगतचा अनधिकृत कचरा कोंडाळा हटविण्याची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कुरुंदवाड वृत्तसेवा : श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयालगत मजरेवाडी ग्रामपंचायतीने रस्त्यावर बांधलेला कचरा कोंडाळा तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ए.डी. चव्हाण यांनी मजरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
कुरुंदवाड येथील ए.डी. वार्ड क्रमांक १, भैरववाडी येथील रहिवासी असलेल्या चव्हाण यांचा प्लॉट मजरेवाडी हद्दीत श्री दत्त महाविद्यालयालगत आहे. त्यांच्या प्लॉटसमोर ग्रामपंचायतीने रस्त्यावरच कचरा कोंडाळा उभारल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
कचरा कोंडाळ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिक व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार सूचना करूनही कचरा कोंडाळा हटविण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कचरा कोंडाळा तातडीने हटवून परिसर स्वच्छ करावा, अन्यथा वरिष्ठ स्तरावर तक्रार करून ग्रामपंचायतीविरोधात कारवाईची मागणी करावी लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशराव अबिटकर तसेच कुरुंदवाड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!