Edition

शिराळा विधानसभा मतदारसंघ “क्षय” रोग मुक्त करण्याचा संकल्प करा.असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा, दि.24 :
आरोग्य सेवा लोकांना मिळावी यासाठी आपण स्वतः प्रयत्न करा. आरोग्य संपन्न गाव योजनेत सहभाग घ्या असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा तहसील कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देतानाच आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती, शिराळा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभा सदस्य तथा समितीचे अध्यक्ष आमदार सत्यजित देशमुख होते.

बैठकीचे स्वागत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी केले. यावेळी शिराळा व वाळवा तालुक्यातील आरोग्यविषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, यासह विविध आरोग्य योजनांची सद्यस्थिती व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. कोणताही पात्र नागरिक शासकीय आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य साईतेजस्वी देशमुख,राजेश्वरी नाईक, विराज नाईक,अभिजीत पाटील, जयराज पाटील, तहसीलदार शामला खोत, गटविकास अधिकारी स्नेहल नौवकुडकर यांच्यासह शिराळा व वाळवा तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रम कदम यांनी शिराळा व वाळवा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य निर्देशांकांची माहिती पदाधिकारी व समिती सदस्यांना दिली. आरोग्य संस्थांमधील सेवा, उपलब्ध सुविधा तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा ही यावेळी घेण्यात आला.
बैठकीस वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे, डॉ. राणोजी शिंदे, डॉ. गणेश राजमाने, डॉ. संदीप कोडक, डॉ. विशाल पवार, डॉ. सुनील जाधव, डॉ. राजेंद्र भिसे यांच्यासह शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिराळा व वाळवा तालुक्यातील नागरिकांपर्यंत विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी अधिक गतिमानतेने व समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकारी, समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी मानले.

फोटो ओळ :- शिराळा तहसील कार्यालय एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सत्यजित देशमुख,जिल्हा परिषद सदस्य साईतेजस्वी देशमुख,सिव्हिल सर्जन विक्रम कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!