Edition

आप्पासाहेब नाईक दादा पैसा फडं बँकेची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न सभासदांना १५% डिव्हीडंडचे वाटप..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसाफडं शेतकरी सहकारी बँक लि.हुपरी यांची २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अहवालात सालात ५.३२ कोटी इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतूदनंतर निवळ नफा १ कोटी १२ लाख झाला अशी माहिती बँकेच्या जनरल सभेवेळी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली बँकेच्या दहा शाखेंच्या माध्यमातून १७८ कोटींच्या ठेवी झाल्या तसेच ११९ कोटी इतक्या रकमेचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक ९१.५० कोटी असून बँकेचा व्यवसाय १०३२ कोटी इतका आहे. खेळते भांडवल २२८ कोटी इतकी आहे बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच ही बँक आज नावलौकिकला आल्याचेही व सेवकांच्या तितक्याच मोलाच्या सहभागाने सुरू असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी सांगितले बँकेचा नेट एनपीए ०% टक्के आहे सी.डी.रेशो ६६.९३% असून थकबाकीची टक्केवारी १.२५% इतकी आहे बँकेने ऑडिट वर्ग मिळवलेला आहे सर्व शाखा संगणकृत करण्यात आले असून ग्राहक व खातेदार यांच्या सोयीसाठी अध्यायवत सुविधा बँकेमार्फत पूर्ण झाल्या असून नियमित कर्ज फेड करण्याकरता १ ते २.६०% पर्यंत व्याजात सूट दे दिल्या असून नियमित कर्जफेड करणाऱ्या ५०३ कर्जदार सभासदांना ५२ लाखापर्यंत व्याजात सूट देण्यात आली आहे.त्यामुळे सभासदांना नियमित कर्ज फेड करण्याची प्रेरणा मिळत आहे यावेळी बँकेचे संचालक श्री कलाप्पाना गाठ,श्री विलासराव नाईक,श्री प्रकाश जाधव,श्री शितल कुमार पाटील,श्री अरुण कांबळे,श्री धनाजीराव भोसले,श्री आनंदराव उलपे,धनंजय खेमलापुरे,बाळासाहेब गाट, घनश्याम माळी,संतोष पाटील,अमर गायकवाड, संचालिका सौ मैथिली पाटील,उपस्थित होत्या तसेच बँकेचे मॅनेजर शिरीष आवटी यांनी नोटीस वाचन केले असिस्टंट मॅनेजर्स श्री गजानन माळी यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले श्री शिरीष आवटे यांनी ताळेबंद अंदाजपत्रक वाचन करत शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी विषय पत्रिकेवरील उर्वरित विषयांचे वाचन व सूत्रसंचालन केले आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्लाप्पाण्णा गाट यांनी मानले यावेळी बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!