Edition

कष्टाला यशाचे नाव.. शेवटी तो दिवस उगवलाच…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कवठे गुलंद गावच्या मातीत जन्माला आलेला ह्यो पोरगा.. शांत मनमिळावू आणि अफाट कष्ट करून सगळ्यांच्या मनात बसलेला आदेश.. हो आदेश उद्धव भगत… लहान पनापासून घरात कष्टाचे आणि गरिबीचे वातावरण मात्र राबून खाणे आणि देशसेवक असलेल्या आजोबांचे झालेले संस्कार. आदेशचे शिक्षण मराठी शाळा कवठे गुलंद आणि लाल बहादूर शास्त्री हायस्कूल कवठे गुलंद येथे झाले.हालाकीच्या परिस्थिती मध्ये त्याने त्याचे उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्वप्न पाहिले काही तरी होण्याचं त्या साठी त्याला त्याचे काका शिवकुमार भगत यांचा पूर्ण पाठिंबा आणि त्याच्यावर विश्वास होता.वडिलांनी शेती करत आणि आदेश ने काम करून त्याचा हा प्रवास सुरू केला. मात्र म्हणतात ना सुखी आयुष्यात मिठाचा खडा पडला. आदेश चे काका शिवकुमार भगत अल्पावधीतच त्याला सोडून गेले. काकांचा लाडका असलेला आदेश मात्र आता पोरका झाला.जणू काही त्याचा एक खांब कोसळला.आदेश पूर्ण खचून गेला. काकांच्या नंतर त्याचा व्यवसाय म्हणजे ऊस तोडी साठी त्यांचा असलेला ट्रॅक्टर आणि गावातील ऊस तोड कामगार त्याच्या पदरात पडले. रोज सकाळी उठायचं कामगारांना घेऊन ऊस तोडी करून ट्रॅक्टर घेऊन कारखाना गाठायचा हे त्याचे दिनक्रम ठरले.काकांच्या मधून सावरतो न तेव्हा त्याला देशसेवक असलेल्या आजोबांनी पोरक केलं आता मात्र त्याचे सगळेच स्वप्न भंग झाले.आदेश वर जसे की आभाळ कोसळले. परिस्थिती सावरते तेवढ्यात त्याचा जन्मदाता त्याला अर्धवट परिस्थितीत सोडून गेला. वडिलांच्या जाण्याने आदेश आणि त्याचे कुटुंब पूर्ण खचून गेले. काहीच दिवसात होत्याच न्हवत झाल्याने त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढासळला.शेती,ट्रॅक्टर, ऊस तोड एवढेच जणू त्याचे स्वप्न राहिले.पण म्हणतात ना “अपयश म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची संधी आहे.”
परत एकदा त्याने ध्येय मनाशी बांधून खचून न जाता आपल्या काकांचे आजोबांचे आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठाणले. आदेश ने परत एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि ध्येय जवळ करण्यासाठी स्पर्धा परीक्षा जवळ केल्या. पोटाला अन्नाचा विचार न करता काम करून अकॅडमी मध्ये अभ्यासाचा प्रवास त्याने सुरू केला आणि शेवटी तो दिवस उगवलाच.12 ऑगस्ट रोजी त्याचा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर चा निकाल लागला आणि आदेशने कष्टाचे चीज केले.गावात जल्लोष सुरू झाला.STI मध्ये यश संपादन केल्याने आदेश चे पंचक्रोशीत कौतुक होत होते.
पण देवाने त्याला एवढ्यावर थांबवले नाही.गावातील सगळ्या लोकांना मोठा धप्पा अजून बाकी होता.दिवस होता 14 ऑगस्टचा. PSI, दुय्यम निबंधक, असिस्टंट section officer आणि sales tax inspector अशा पोस्ट त्याने हस्तगत केल्या. कवठे गुलंद गावात तसेच शिरोळ तालुक्यात अशी कामगिरी करणारा आदेश एकमेव अवलिया होता. आज पर्यंतच्या कवठे गुलंद मधील इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी करणारा आदेश एकमेव ठरला. त्याच्या या कामगिरीत त्याच्या मोठ्या भावाचा सगळ्यात मोठा वाटा आहे.आदेशच्या या यशात त्याचा मित्र वर्गाचा सुद्धा खारीचा वाटा होता.14 ऑगस्ट चा तो दिवस त्याच्या मित्रांनी त्याच्या साठी खास बनवला. गावात त्याची मिरवणूक काढण्यात आली मात्र गावातील लोकांच्या तोंडात एकच वाक्य होत ते म्हणजे आज त्याचा काका,आजोबा आणि वडील हवे होते. त्याने लोकांचे डोळे पाणावले होते.आदेश तुला मात्र पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..

*रिपोर्टर – शितल मगदूम कवठे गुलंद*

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!