Edition

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सेलूकरांचा पाठिंबा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

राष्ट्रपतींमार्फत सरकारला मागण्यांचे निवेदन.

सेलू : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सेलू शहरातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तहसीलदार, सेलू यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आपले मत मांडण्याचा व आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची संवेदनशीलतेने दखल घेऊन आंदोलन कर्त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी तसेच त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा.निवेदनाद्वारे केंद्र सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच नागरिकांच्या भावना व मागण्या शासनापर्यंत तातडीने पोहोचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.निवेदनातील प्रमुख मागण्या :केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.
यावेळी अशोक अंभोरे, ऋषिकेश अंभोरे, विनोद तरटे, पांडुरंग कदम, विनोद धापसे, गुलाबराव खेडेकर, जावेद पठाण, शेख साजिद, इरफान पठाण, रणजीत कुरेशी, पंजाबराव पोळ, अरुण ताठे, विष्णू नाईक नवरे, अविनाश मोगल, अक्षय साळवे, रितेश आठवे, शिवाजी पवार, विशाल जाधव, आमिर पठाण, सुदर्शन काष्टे, कैलास लाटे, दिलीपराव शेवाळे, प्रसाद महाराज काष्टे, विष्णू खेडेकर, राजू सहजराव यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे निवेदन सेलू शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!